गोळीबाराच्या वेळी बारमध्ये अनेक लोक उपस्थित होते.
मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर ट्रकमधून आले होते आणि त्यांनी बारमध्ये घुसून गोळीबार सुरू केला होता. गोळीबार केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. बारमध्ये अनेक लोक उपस्थित असताना ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात 10 जण जखमी झाले असून 7 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 7 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.