Homeराजकीयहिवाळी अधिवेशनात दौंडचा आवाज घुमला; आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील प्रश्न...

हिवाळी अधिवेशनात दौंडचा आवाज घुमला; आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील प्रश्न अधिवेशनात पोटतिडकीने मांडला

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

नागपूर — हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु असून अधिवेशनात दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध विषयावर आमदार राहुल कुल यांनी विविध मुद्दे मांडले आहे.

सध्या दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याचा वाढता वावर व बिबट्या व माणसांमधील वाढता संघर्ष लक्षात घेता शासनाने तातडीने उपयोजना कराव्यात व दौंड तालुक्यातील कडेठाण येथील बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या स्व. लता धावडे यांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली.

खडकवासला कालवा ते फुरसुंगी बंदी नळी कालवा सुमारे २२०० कोटींचा प्रकल्प तसेच जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) चे काम तातडीने पूर्ण करावे, मुळशी धरणाचे पाणी पुर्वमुखी वळविण्यात यावे, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना बंद नळीतून करण्यात यावी, पुरंदर उपसा अंतर्गत खुपटेवाडी फाट्याची पुनर्रचना करण्यात यावी, पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने नदी जोड प्रकल्प, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प तातडीने आदी प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून, एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा कालावधी वाहतूक कोंडीमुळे लागत आहे त्यासाठी आवश्यक असलेला पुणे रिंग रोडचे काम गतीने पूर्ण करावे.

ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविणे तसेच कुरकुंभ, ता. दौंड येथील MIDC मध्ये सापडलेल्या MDF ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

राज्याच्या ग्रामीण भागातील नकाशावर समाविष्ट नसलेल्या रस्त्यांना शासनाकडून कोणत्याही निधी तरतुद नाही. ग्रामीण रस्त्याला निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, दौंड तालुक्यातील अनेक रस्ते आजही नकाशात नसल्याने त्यांना निधी मिळत नाही, त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नात करण्यासाठीचा प्रस्ताव मागील अनेक दिवसापासून ग्रामविकास विभागात प्रलंबित आहे त्याला तात्काळ मान्यता द्यावी.

सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अनेक जन अडकलेले आहेत, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबरचे मुख्यालय स्थापन करावे तसेच यामध्ये बळी पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तातडीने मदत मिळण्यासाठी उपाययोजना करणे

उद्योगातील प्रदूषित पाण्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे तसेच जमिनीचा पोत देखील खराब होत आहे. तसेच कुरकुंभ, ता. दौंड येथील केमिकल कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने जागरूक राहून काम करावे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेती ही उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात या भागात दुष्काळ पडतो त्यामुळे या भागात बुडीत बंधारे बांधावेत तसेच चिबड जमीनीचे निर्मुलन करण्यासाठी शासनाने उपयोजना कराव्यात अशा विविध मागण्या सभागृहात चर्चे दरम्यान केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हर्च्युअल डिजिटल अ‍ॅसेट मार्केटमध्ये कॉर्पोरेट सहभागाची व्याख्या करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या एफएससीची योजना अनावरण करा

दक्षिण कोरिया आपला वेब 3 मार्केट विकसित करण्यासाठी विविध अंतर्गत अधिका authorities ्यांसह सहकार्य करीत आहे. नुकत्याच एका हल्ल्यात, वित्तीय सेवा आयोगाने (एफएससी) स्थानिक...

विराट कोहली ऑन फोन कॉल ऑन इंडिया ट्रॉफी सेलिब्रेशन, व्हायरल व्हिडिओ इंटरनेट तोडतो

अहमदाबादमध्ये वेड्सवर तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात १2२ धावांनी जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडवर -0-० व्हाईटवॉश लावला. रोहित शर्माच्या क्षमतेनुसार घरातील व्हाईटवॉश ही चौथी मालिका व्हाईटवॉश होती, जी...

दौंड मध्ये ग्रामदैवतांची वज्रलेप नंतर पुन : प्रतिष्ठापना; काळभैरवनाथांचे तेज झळाळले

  संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज दौंड -- दौंड शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीची झीज होत होती. मूर्तीची ही झीज रोखण्यासाठी आणि दोन्ही पुरातन...

error: Content is protected !!