वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड, : सिंधी समाज आयोजित सिंधी प्रीमिअर क्रिकेट लीगचे सातवे पर्व यंदा दौंड येथे २० जानेवारी ते ३० जानेवारी असे ११ दिवस गुरुनानक सिंधी धर्मशाळा मैदान झुलेलाल चौक दौंड येथे भरविण्यात येणार आहे. यंदा स्पर्धेत एकूण ७२ खेळाडूंचा समावेश असलेले ८ संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीचे भरत दावरा,रोहन टेकचंदाणी,आकाश अदनानी,गौरव गिदवाणी,राहुल नेहलानी,यांनी दिली.
मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल सिटी इन दौंड येथे सर्व खेळाडूंचा लिलाव झाला या मध्ये संघमालक – पंकज कृपलानी, प्रदीप कुकरेजा, शंकर नारंग, उमेश कृपलानी, आकाश गिदवाणी, भावेश बेहरानी, नवीन दावरा, शिवम मुलचंदाणी, इत्यादी उपस्थित होते यावेळी दौंड शहरातील उद्योजक प्रताप दादा लुंड, मोतीशेठ मेवानी व सिंधी समाजातील व्यापारी उपस्थित होते ,
“देशभरात विखुरलेल्या सिंधी समाजाने एकत्र यावे. त्यांच्यात तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते.”
“गेल्या सहा हंगामांत स्पर्धेला मोठ्या प्रमाणात सिंधी युवकांकडून प्रतिसाद मिळाला.
सिंधी प्रीमिअर क्रिकेट लीगचे ८ ही संघांची नावे सिंधी संस्कृतीवर आधारित आहेत.