संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
आलेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी असणारे नवनाथ कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर हंबीरराव धुमाळ यांची बहुमताने निवड करण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी ढवाण यांच्या अध्यक्षतेखाली आलेगाव ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेण्यात आली होती. सरपंच पदासाठी हंबीरराव धुमाळ व अमोल काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
यावेळी सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल करण्यात आल्याने हंबीरराव धुमाळ यांना ५ मते मिळाली तर अमोल काळे यांना ४ मते मिळाली. त्यामुळे आलेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हंबीरराव धुमाळ यांची बहुमताने निवड होऊन निवडीची घोषणा यावेळी करण्यात आली.
दौंड तालुक्यातील पूर्व भागातील आलेगाव येथील दौंड शुगर साखर कारखान्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची व राजकारणातील केंद्रबिंदू व शक्तिस्थान मानल्या जाणाऱ्या आलेगाव ग्रामपंचायतीच्या मध्यावर्ती निवडणुकीमध्ये सरपंच पदी हंबीरराव धुमाळ विराजमान झाले.
माजी उपसरपंच वसंत धुमाळ, पाटस साखर कारखाना कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजी काळे, महादेव इंगवले, नितीन काळे, महेश काळे, सेवानिवृत्त पी. एस.आय बाळासाहेब धुमाळ, रमेश धुमाळ, ग्राहक पंचायतीचे शरद गुणवरे, शिवाजी ढमढेरे, दिलीप चितारे, महेंद्र चितारे, प्रविण चितारे, आबा कडू, दत्तात्रय धुमाळ, विशाल धुमाळ, कृष्णा धुमाळ, माजी उपसरपंच बाबासाहेब धुमाळ, भालचंद्र जगताप, अरुण रणशिंगारे, गौतम आरवडे, माजी सरपंच भाऊसाहेब काळे तसेच माजी सरपंच तृप्ती काळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.