दौंड — दौंड शहरांमध्ये सदाबहार गायक किशोर कुमार यांची ३७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय किशोर कुमार यांच्या प्रतिमेला किशोर कुमार फॅन क्लबचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, सचिव किशोर डावरा,लोकमतचे पत्रकार मनोहर बोडखे यांनी पुष्पहार समर्पित केला.
यावेळी विकास देशपांडे, रमेश गलांडे,शैलेश देशमुख, अभिजीत भागवत, बाळू कोळी, चंद्रशेखर पलंगे, हरी मरगज, सुनील स्वामी, अलीम शेख, निखिल स्वामी, निलेश गायकवाड, सुरेश जगताप, केदार लेले, सचिन गोलांडे ,अजय लेले उपस्थित होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात किशोर कुमार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी किशोर कुमार यांनी गायलेल्या सदाबहार गाण्यांच्या ध्वनीफीती लावण्यात आल्या होत्या. या ठिकाणी रसिक वर्ग मोठ्या कुतुहलाने किशोर कुमार यांनी गायलेले गीते ऐकत होते.याप्रसंगी किशोर कुमार फॅन क्लबचे अध्यक्ष प्रवीण परदेशी म्हणाले की गेली ३७ वर्ष एकाच ठिकाणी किशोर कुमार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. या उपक्रमाला दरवर्षी रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो.
दरम्यान भविष्यात किशोर कुमार यांच्या पुण्यतिथी व्यतिरिक्त त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करून नवोदित गायकांना एक आगळी वेगळी संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. तेव्हा या उपक्रमाला देखील मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले.