वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड : संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज युवक प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने मंगळवारी (ता. १३) कार्तिक शुद्ध एकादशीला विश्वसंत श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ७५४ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. श्री विठ्ठल मंदिर येथे पहाटे ५ वाजता या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला होता. या सोहळ्यात श्री संतोष कटारे आणि सौ.ज्योती कटारे या दांपत्याच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि नामदेव महाराज यांच्या मूर्तीला महाअभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी बारा वाजता नामदेव महाराजांची महाआरती व पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता विठ्ठल मंदिरात दिव्यांची आरास करण्यात आली. लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता. बुधवार (ता.१३) रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत नामदेव शिंपी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.