दौंड — केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे उलटले तरी अद्याप संशयित आरोपी फरार आहे. हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी मराठा महासंघाच्या वतीने सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे,त्यांनी फरार मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अन्यथा मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी आनंद जगताप, बाबा पवार, शैलेश पवार, अविनाश गाठे, रोहन घोरपडे, सुधीर शितोळे, संदीप फराटे, अशोक जगदाळे, शंतनु निंबाळकर, ज्ञानेश्वर मुळे, भाऊसाहेब गायकवाड, संजय नांदखिले, सज्जन काकडे, आदिनाथ थोरात, विश्वासराव कदम, संदिप जगताप, राहुल पवार, रमेश काळे, विनय लोटके उपस्थित होते.