संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — शैक्षणिक क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असणारे संस्कार प्रायमरी हायस्कूलचे अध्यक्ष जयंत अंबादास पवार यांनी आपल्या कर्तुत्वाने उंच भरारी घेतली आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असताना प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत.तसेच दरवर्षी गरीब गरजू मुलेमुलीना दत्तक घेऊन त्या मुलांचा शैक्षणिक खर्च ते स्वतः करत आहेत. वृक्षारोपण करणे, दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करणे, दौंड शहरातील श्रीराम मतिमंद शाळेत शालेय साहित्याचे वाटप करत जयंत पवार यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली. जयंत अंबादास पवार यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाज रत्न पुरस्कार आमदार राहुल कुल यांच्या हस्ते जयंत पवार यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार राहुल कुल, ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, अंबादास पवार, गणेश शेंडगे, ओमकार जाधव, सतीश थोरात, तेजस कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.