वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राहुल कुल तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा प्रचार चालू आहे. निवडणूक आमदारकीची असली तरी आगामी दौंड नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उन्हातान्हाची पर्वा न करता इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे.आपल्या प्रभागातून आपल्या नेत्याला मताधिक्य मिळवून देण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धांच लागली आहे.
आमदारकीची निवडणूक असतानाही काही नेते मंडळी दौंड नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रचार करत असताना दिसत आहे.शहरात कुल समर्थक आणि थोरात समर्थकांकडून प्रचाराचा झंझावात पाहिला मिळत आहे.
महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ५ मधील कुंभार गल्ली तसेच अण्णा भाऊ साठे नगर मध्ये घरोघरी जाऊन राहुल कुल यांच्या विकास कामांचे पत्रक वाटप करत आहे.या प्रचार दौऱ्यात निलेश सावंत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरल्याचे दिसत आहे.दौंड शहराच्या राजकारणात माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांचा दबदबा आहे.ते महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांचा प्रचार करत आहे.सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.गरीबांचा मसीहा म्हणून त्यांची तालुक्याच्या राजकारणात ख्याती आहे. तसेच कुंभार गल्लीच्या राजकारणात दबदबा असणारे दत्तात्रय उर्फ बुवा सावंत २००६ मध्ये नगरसेवक होते पुढे जाऊन ते उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी पदे भूषविले आहे. ३० वर्षांच्या सक्रिय राजकारणात त्यांनी अनेक सामाजिक, धार्मिक तसेच शैक्षणिक कामे केली. शिवजयंती उत्सव सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.ते शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्याच विचारांचा वारसा घेत त्यांचे पुत्र निलेश सावंत हे दूरदृष्टी असणारे नेतृत्व उभे राहत आहे.निलेश सावंत यांनी सलग दोन वेळा दौंड तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्षपद भूषविले आहे.कुंभार गल्लीत स्वामी विवेकानंद मित्र मंडळांची स्थापना करुन त्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम करत आहे. शहरातील दत्तपीठ मंदिरांची उभारणी करुन विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.गो शाळा सुरू करून गो मातेचे रक्षण करीत आहे. त्यामुळे कुंभार गल्ली, अण्णा भाऊ साठे नगर मधुन कुल कि थोरात यापैकी कोणाला मताधिक्य मिळणार हे पहावे लागेल.
नेते मंडळी नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आमदारकीचा प्रचारात उतरले आहे. प्रचार आमदारकीचा लक्ष नगरपालिकेचे असे चित्र दौंड शहरातील सर्वच प्रभागात दिसत आहे.राजकीय परिस्थितीवरील कार्यकर्त्यांची एक प्रकारे पूर्व तयारीच आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची पण नगरपालिकेची रंगीत तालीम होत आहे.
निलेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक पाच मध्ये महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक पाच मधून जास्तीत जास्त मताधिक्य राहुल कुल यांना मिळवून देणार असा विश्वास निलेश सावंत यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी गणेश आल्हाट, मारुती औरंगे, योगेश चुंबळकर, उमेश शितोळे, शिरीष झोजे, गणेश झोजे, अक्षय घोलप,धीरज दिवटे, अमित मोरे, हिरण खुडे, सागर लोखंडे, करण सोनवणे, साहिल खंडागळे, आकाश पवार, बाबू खुडे हे प्रमूख कार्यकर्ते उपस्थित होते.