दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी/ सुरेश बागल
दौंड तालुक्यातील कुरकूंभ येथील माझी ग्रा.पं. सदस्य विजय ज्ञानदेव गिरमे यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दौंड तालुका अध्यक्ष पदी निवड झाली .गिरमे यांनी गावातील विविध सस्थांची पदे भुषविलेली आहेत.त्या माध्यमातून गिरमे यांनी सामाजिक कार्य केले आहे.गिरमे यांना माझी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते निवडीचे पत्र पुणे येथे देण्यात आले. यावेळी समता परिषद प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, राज्य सदस्य अविनाश चौरे,विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, समता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष अनिल लडकत,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल,पुणे जि. संघटक सपना माळी,पुणे शहर कार्याध्यक्ष सागर दरवडे, बारामती उपाध्यक्ष तेजस लोणकर,सोलापूर जिल्हा सदस्य गणेश माळी, दौंड ओबीसी युवा नेते अनिकेत भागवत, क्रांतीसुर्य न्यूज चे संपादक प्रविण बोचरे,कोथरूड अध्यक्ष प्रदिप हुमे,प्रदीप बनसोडे,अलंकार खेडेकर शेवाळवाडी अनेक समता सौनिक उपस्थित होते.गिरमे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कुरकुंभ परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. माझी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. यापुढेही या पदामुळे पुढील सामाजिक काम करण्यास आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव तयार असेन. असे गिरमे यांनी आपले मत व्यक्त केले.