Homeराजकीयविकासकामांच्या पोकळ गप्पा विरोधकांनी मारू नये - राजेंद्र खटी

विकासकामांच्या पोकळ गप्पा विरोधकांनी मारू नये – राजेंद्र खटी

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड : दौंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हळूहळू रंगत चढत चालली असून दोन्हीकडून आरोप – प्रत्यारोप च्या फैरी झडत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांचा गावोगावी संपर्क, भेटीगाठी, प्रचार दौऱ्यामुळे दौंड तालुक्यात तुतारीने जोर पकडला आहे.यामुळे विरोधकांना एक प्रकारची धास्ती बसली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नावाचा झंझावात तालुक्यातील विरोधकांना यामुळे धसका बसतोय.

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना पूर्व भागातील गावागावांतून वाढता प्रतिसाद मिळत आहे.

काळेवाडी येथील सभेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खटी म्हणाले, दौंड तालुक्यातील हजारो एकर जमीन सिंचनाखाली यावी, म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी सरांनी सात केटी वेअर (कोल्हापूर पद्धतीचे बंधारा) दिले.दौंडकर जे पाणी पित आहे ती मनोहर जोशी सरांची कृपा आहे.आत्तापर्यंत २ कर्जमाफी पैकीं एक शरदचंद्र पवार साहेब व दुसरी उध्दव ठाकरे साहेब यांनी केली आहे.तिसरी कर्जमाफी केली तर ती महाविकास आघाडीच करेन.असा विश्वास व्यक्त केला.त्यामुळे तालुक्यातील विरोधकांनी विकासकामांच्या गप्पा मारू नये.अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.तसेच विविध विकास कामांचा दाखला शिवसेना नेते राजेंद्र खटी यांनी दिला.

यावेळी रमेश थोरात,आप्पासाहेब पवार, अनिल सोनवणे, हरेश ओझा, दिपक सोनवणे,संदीपान वाघमोडे,आबा वाघमारे, सचिन खरात, उत्तम आटोळे, सचिन काळभोर, स्वप्नील पाटोळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अटॉमफॉलचा गेम पास ‘प्रचंड यश’ लाँच करतो, बंडखोरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात

मागील महिन्यात पीसी, प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्स प्लॅटफॉर्मवर लाँच केलेला अटॉमफॉल, बंडखोरीच्या घडामोडींमधील अ‍ॅक्शन-सर्व्हिव्हल गेम. पहिल्या दिवशी गेम पासवरही हे प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर दोन...

आरसीबी स्टार टिम डेव्हिडने पंजाबच्या राजांविरूद्ध सलग 3 षटकारांची नोंद केली, प्रत्येकाला स्तब्ध केले...

पंजाब किंग्जने द्रुत धावा आणि चतुर गोलंदाजीचा दबाव रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला शुक्रवारी पाऊस पडल्यामुळे नऊ प्रतिनिधी टिम डेव्हिडच्या रोलिकिंगला प्रति बाजूला 14 षटकांवर निराशाजनक...

error: Content is protected !!