वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड | महान समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी दौंड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर हजारो भीम अनुयायी नतमस्तक झाले. सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक समोर भीम अनुयायी एकत्रित येत डाॅ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून,मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली व त्रिशरण पंचशील आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यावेळी मानवंदना देण्यात आली. संध्याकाळी ६:३० वाजता कॅण्डल रॅली काढण्यात आली व ७:०० वाजता ‘भीम संध्या’ या भीम गीतांच्या माध्यमांतून महामानवला आदरांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय कलाकार महासंघ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दौंड शहरातील तसेच तालुक्यातील भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते. भीम संध्या या भीम गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन जयदीप बगाडे, भारत सरोदे यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी तहसीलदार श्रीकांत शिंदे, संजय आढाव, नागसिंग धेंडे, सागर जगताप, यादव जाधव, राजू जाधव, अभिजीत शिंदे, बी वाय जगताप उपस्थित होते.