वृत्तवेध न्यूज नेटवर्क
लोणारवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच जयश्री गोरख गाढवे यांनी राजीनामा दिल्यानंतर ती जागा रिक्त होती त्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. यामध्ये दत्तात्रय वाळुंजकर यांना ५ मते तर पूजा महेश धगाटे यांना ४ मते मिळाली तसेच अनिल नामदेव पुणेकर यांना ० मतं मिळाली,त्यांना आपले खाते पण उघडता आले नाही. त्यामुळे या निवडणुकीत दत्तात्रय वाळुंजकर यांची उपसरपंचपदी निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शिंदे यांनी कामकाज पाहिले. यावेळी माजी सरपंच गोरख गाढवे, सदस्य दत्ता वाघ,माजी चेअरमन हनु आप्पा, चेअरमन संदीप वाघ, माणिक पुणेकर तंटामुक्ती अध्यक्ष सुनील देवकाते, युवा सेना उप तालुकाप्रमुख किरण वाळूकर उपस्थित होते.