दौंड : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशानुसार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्या नेतृत्त्वाखाली नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. दौंड शहरातील सामाजिक कार्यकर्ते जानी बाबा शेख यांची दौंड तालुका अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच मयूर उदावंत यांची जनरल कामगार दौंड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.व उज्ज्वल पांडुरंग सुर्वे यांची दौंड तालुका संघटक म्हणून निवड झाली.या सर्वांची निवड जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांनी जाहीर केली.यावेळी शहर अध्यक्ष शशांक गायकवाड, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष संजय ऐरेल्लू,विद्यार्थी आघाडी दौंड शहर अध्यक्ष अभय भोसले,दिगंबर रिकीबे दौंड शहर कार्याध्यक्ष, सन्नी गायकवाड दौंड शहर कार्याधक्ष युवा, व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपास्थित होते.