Homeराजकीयराहुल दादा... जनसेवेच्या या कार्यात आम्ही सदैव आपल्या सोबत | आनंद थोरात

राहुल दादा… जनसेवेच्या या कार्यात आम्ही सदैव आपल्या सोबत | आनंद थोरात

 

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड | दौंड तालुक्याच्या विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे एक दूरदृष्टी असलेला नेता असून दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जनसेवेच्या या कार्यात मी यापुढे राहुल कुल यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या विजयाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे अशी माहिती भीमा पाटस साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दिली आहे. यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवणे गरजेचे आहे म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राहुल कुल यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

खडकवासला भुयारी मार्ग मुळशीचे पाणी यासारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी राहुल कुल यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे म्हणून राहुल कुल यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातील जनतेला मी आवाहन करत आहे असे देखील थोरात म्हणाले, आनंद थोरात दौंड तालुक्यातील एक मोठे प्रस्थ असून माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आहेत आनंद थोरात यांच्या सक्रिय सहभागामुळे राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.राहुल कुल यांच्या नावाचा झंझावात मुळे विरोधकांना चांगलाच धसका बसलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...
error: Content is protected !!