Homeराजकीयराहुल कुल यांचा प्रचाराचा झंझावात | दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या...

राहुल कुल यांचा प्रचाराचा झंझावात | दौंड – पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांशी राहुल कुल यांनी साधला संवाद

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड – तालुक्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आज राहुल कुल यांनी महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेत, दौंड रेल्वे स्टेशनवर जाऊन दौंड- पुणे रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची भेट घेतली. सकाळची ७:०५ वा. ची दौंड- पुणे शटल, हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस, मुंबई कुर्ला एक्सप्रेस, ८:२० वा. ची बारामती- पुणे डेमू या गाडीने रोज प्रवास करणाऱ्या दौंडकर प्रवाशांशी संवाद साधला,व मतदान करण्याचे आवाहन केले. दौंडकर प्रवाशांनी सुद्धा आमदार राहुल कुल यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी मतदाराची कुल यांनी भेट घेतली. यावेळी युवा मतदारांनी राहुल कुल यांच्याबरोबर सेल्फी काढीत आम्ही तुम्हालाच मतदान करणार असल्याचा शब्द दिला. राहुल यांनी रेल्वे डब्यात जाऊनही दौंडकर मतदारांशी संवाद साधला. राज्यात महायुतीने केलेली विकास कामे तसेच आमदार राहुल कुल यांनी दौंड मतदार संघात आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी व केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचे मतदारांना वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), लहुजी यंग ब्रिगेड, भीम वॉरियर्स संघटना तसेच इतरही मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

error: Content is protected !!