दौंड : विजयादशमी उत्सवानिमित्त दौंड शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन व शस्त्र पूजन झाले. यात सहभागी असलेल्या संघाच्या घोष पथकातील विविध वाद्यांच्या तालावर हे संचलन शिस्तबद्धपणे शहरातून मार्गस्थ झाले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथील प्रशासकीय इमारत तहसीलदार कचेरीच्या प्रांगणातून सायंकाळी सहा वाजता सह घोष पथसंचलनाला सुरुवात झाली.
पथसंचलन व शस्त्रपूजन उत्सवाचा समारोप सरपंच वस्ती येथील महेश्वर सोसायटीत झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकापासून ते सरपंच वस्ती पर्यंत ठिक ठिकाणी संचलनाचे फुलाचा वर्षाव करून स्वागत नागरिकांनी केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुण्या ब्लॉसम नर्सरीच्या अध्यक्षा शैलेजा विनोद सरनोत तसेच प्रमुख वक्ते म्हणून सुनील भालेराव उपस्थित होते.यावेळी संघ स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.