संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड– दौंड शहरातील युवा नेतृत्व प्रमोद दत्तात्रय सावंत यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दौंड शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र शहर अध्यक्ष निखिल स्वामी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे, आचार-विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार,असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.