वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड | दौंड शहरात रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. रांगोळी ही प्राचीन भारतीय लोककला आहे.पांढऱ्या रांगोळीवर विविध रंग भरून सुंदर अशी कलाकृती सादर होते, हा विशेष गुण असून या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. दौंड नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी विजय कावळे यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात मुलीनी व महिलांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी मुख्याधिकारी विजय कावळे यांनी सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती.तसेच त्यानी दौंडच्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करून मतदान जनजागृती केली.