वृत्तवेध न्यूज नेटवर्क
दौंड : संपुर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजेच ख्रिसमस. दौंड शहरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा एक महत्त्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबरला प्रभू येशूचा जन्मदिवस नाताळ म्हणून साजरा करण्यात येतो. याप्रसंगी प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते.
ख्रिश्चन बांधवांनी नाताळ सणाच्या आगमना अगोदरपासूनच प्रार्थना कॅरॉल्सच्या गायनास सुरूवात केली होती. ख्रिसमसच्या निमित्ताने अनेक ठिकाणी ख्रिसमस ट्रीसह चर्चवर सुंदर अशी आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. उत्साहपूर्ण वातावरणात रात्री बारा वाजता प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी मध्यरात्री ख्रिस्तजन्मोत्सव मोठ्या आनंदोत्सवात तसेच फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी नाताळ सणानिमित्त विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना, उपासना, प्रभुभोजन आदी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सांताक्लॉजची वेशभूषा परिधान करून बंचे कंपनीने धमाल मस्ती केली. नाताळनिमित्त दौंड शहरातील सर्व चर्चमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी दौंड शहरात ख्रिसमस सेलिब्रेशनचा उत्साह पाहायला मिळाला.
“ख्रिसमस निमित्त दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये ख्रिस्तजन्माचा देखावा सादर करण्यात आला होता”. पॅरिश प्रीस्ट फादर एस ए. लुईस व फादर जोव्हिएन डिमेलो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री अकरा वाजता कॅरल्स हा ख्रिस्त जन्मापूर्वीचा कार्यक्रम झाला. रात्री बारा वाजता ‘मिस्सा’ झाली