दौंड : देऊळगाव राजे येथील पवार कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला. सौ.विजया भारत पवार (वय.६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले.त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष पवार व शिव व्याख्याते दिनेश पवार यांच्या मातोश्री होत्या,त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन सुना, नातवंडे,एक मुलगी,जावई असा परिवार आहे.देऊळगाव राजे मध्ये सर्वांना आधार वाटणाऱ्या ‘काकी’ गेल्याने मायेचा आधार कायमचा हरपला..
दशक्रिया विधी सोमवार दि.४/११/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता, श्री क्षेत्र सिद्धटेक येथे होणार आहे.संघर्षमय वातावरणातून संसार यशस्वी करून मुलांना उच्च शिक्षण देऊन उच्च पदावर यशस्वी करणाऱ्या माऊलीस वृत्तवेध न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.