Homeराजकीयमाजी आमदार 'रमेश थोरात' सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज...

माजी आमदार ‘रमेश थोरात’ सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार

दौंड : माजी आमदार रमेश किसनराव थोरात हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये दौंड तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दौंड शहरातून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज स्मारक येथुन प्रारंभ होणार असून – महात्मा ज्योतिबा फुले स्मारक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक तेथून पुढे छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक येथे येणार आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे.

“माझ्या दौंड तालुक्यातील संघर्षयोद्ध्यांच्या साथीने मी उमेदवारी अर्ज भरत आहे. हा अर्ज केवळ निवडणुकीचा टप्पा नसून, आपल्या संघर्षमय प्रवासाचं आणि विकासाचं वचन आहे.तुमच्या विश्वासाने आणि प्रेमाने मला नेहमीच बळ दिलं, त्यामुळे मी पाऊल पुढे टाकलं आणि तुमच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर मात करता आली. या महत्त्वाच्या क्षणी तुमची उपस्थिती माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत ठरेल. चला, एकत्र येऊ आणि आपल्या तालुक्याचा प्रगतीचा नवा अध्याय लिहूया”

तुमच्या अमूल्य उपस्थितीची मी आतुरतेने वाट पाहतो.अशी विनंती माजी आमदार रमेश थोरात यांच्यावतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंडच्या दौर्‍यासाठी इंडिया ए पथक: यशसवी जयस्वाल, ईशान किशन हेडलाईन टीम, बिग आरसीबी स्टार...

जूनच्या मध्यभागी सुरू झालेल्या इंग्लंडच्या भारताच्या दौर्‍यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या सेवानिवृत्तीनंतर अतिरिक्त महत्त्व आहे. २० जूनपासून इंग्लंडमध्ये भारत पाच...

5 सामान्य कार्ब्स मिथक आपण आता विश्वास ठेवणे थांबवावे

आम्हाला सर्वांना सांगण्यात आले आहे की कार्ब आमच्यासाठी कधीकधी वाईट आहेत, नाही का? "कार्ब खाऊ नका, आपण वजन वाढवू नका" किंवा "कार्ब अस्वास्थ्यकर आहेत"...

error: Content is protected !!