Homeराजकीय'महाराष्ट्र का टायगर अभी जिंदा है' असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंची केडगावच्या...

‘महाराष्ट्र का टायगर अभी जिंदा है’ असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंची केडगावच्या भरसभेतून विरोधकांवर तुफान फटकेबाजी.

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

केडगाव | महाराष्ट्र राज्यावर कितीही मोठी वादळं आली तरी ती परतुन लावणारा महाराष्ट्राचा टायगर अभी जिंदा है,असे म्हणत खासदार अमोल कोल्हेंची केडगाव येथील भरसभेतून विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.

शरद पवार हि व्यक्ती नसून एक ताकद आहे. महाराष्ट्र राज्यावर आलेली संकटे झेलणारा सह्याद्री आहे. दिल्लीकरांनी जाणीवपूर्वक सातत्याने पवार साहेबांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला पण पवार साहेब दिल्ली पुढे कधीही झुकले नाही. पवार साहेब खंबीर आधार देणारा बाप आहे या बापाचे हात बळकट करा,यासाठी तालुक्यात तुतारीचा मतांच्या माध्यमातून असा आवाज घुमवा की कमळाच्या पाकळ्या विखरुण, घड्याळाचे काटेही बंद पडले पाहिजे.असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी तुतारीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ केडगाव येथील सभेत केले. यादरम्यान भाजपाच्या कारभारावर सडकून टीका केली. कोल्हे पुढे म्हणाले, पोलिसांवर दबाव टाकून सर्वसामान्य लोकांची गळचेपी करत आहे. सेवानिवृत्त कामगारांना ऐन दिवाळीत मिरची भाकरी खाण्यास लावणाऱ्याना धडा शिकवण्याची हीच वेळ आली आहे. तुतारीचा आवाज तालुक्यात घुमू द्या आणि रमेश आप्पांना प्रचंड बहुमताने विजयी करा.

यावेळी रमेश थोरात, डॉ. वंदना मोहिते, नामदेव ताकवणे, राजाभाऊ तांबे, बादशाह शेख, अनिल सोनवणे, आबा वाघमारे, उत्तम गायकवाड, बाळासाहेब कापरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली. सूत्रसंचालन दिलीप हंडाळ यांनी तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

error: Content is protected !!