Homeराजकीयमहायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात लाटताहेत : वैशाली नागवडे यांची टीका

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात लाटताहेत : वैशाली नागवडे यांची टीका

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

दौंड | राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कोणी पदाधिकारी समोरच्या उमेदवाराचे काम करत आहेत त्यांचे निलंबन केले जाईल. या निवडणुकीमध्ये महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय रमेश थोरात व यांचे कार्यकर्ते घेत आहेत. रमेश थोरात यांच्यामुळे वीरधवल जगदाळे यांना जिल्हा परिषदचे सभापती पद मिळू शकले नाही. तर मलाही जिल्हा बँकेमध्ये संचालक पदाची संधी न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी केला. यावेळी वीरधवल जगदाळे म्हणाले की, मी रावणगाव येथे प्रचार सभेत सहभागी झालो होतो. यावेळी आमदार राहुल कुल यांनी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्याची परतफेड म्हणून आम्ही आयुष्यात प्रथमच भाजपाचे काम करणार आहोत असे सांगितले.विरोधी पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते आमचाच गट मोठा असे म्हणत असतील तर त्यांनी निवडणुकीनिमित्त दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश का केला? हा आमचा प्रश्न आहे. आमचे एकेकाळाचे सहकारी आप्पासाहेब पवार यांच्या हातातोंडाशी आलेला घास त्यांनी हिसकावला.

गेल्या २ वर्षांमध्ये दौंड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे २ वेळा विभाजन झाले. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले रमेश थोरात हे पक्ष म्हणून नव्हे तर गट म्हणून बाहेर गेलेले आहेत. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षामध्ये‌ नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल.विरोधी पक्षातील काही कार्यकर्ते हे सोयीनुसार आमच्याबाबत अफवा पसरवत आहेत. ही बाब चुकीची आहे.आमच्या सोबत १२ हत्तीचे बळ असणारे नेते अजित पवार आहेत. त्यांचा आदेश शिरसंवाद्य मानून या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व पदाधिकारी आमदार राहुल कुल यांचे काम करणार आहेत. कार्यकर्त्यांनी आमच्या निरोपाची वाट न पाहता आज पासून कामाला लागावे.

यावेळी वीरधवल जगदाळे ,वैशाली नागवडे, गुरुमुख नारंग, नंदू पवार, अनिल साळवे, निखिल स्वामी ,सुहास वाघमारे, आनंद बगाडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

error: Content is protected !!