संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दौंड शहरात संविधान स्तंभ संवर्धन समितीच्या वतीने व दिपक सोनवणे यांच्या पुढाकाराने जयंतीचे औचित्य साधुन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सिद्धांत म्युझिकल नाईट, जल्लोष भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, योगिनी दिवेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, विकास कदम, राजेंद्र खटी, संभाजी ताकवणे, नंदु बनसोडे,नरेश डाळिंबे तसेच इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.