दौंड : दौंड विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, महायुतीचे उमेदवार आमदार राहुल सुभाष कुल हे मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये दौंड तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दौंड शहरातून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज पुतळा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – महात्मा गांधी चौक – छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक येथे येणार आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा होणार आहे. याप्रसंगी आपले प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती आमदार राहुल कुल यांच्यावतीने करण्यात आली आहे.