दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी /सुरेश बागल
दौंड शहरातील बौद्ध विहाराचे काम थांबलेले असून ते तातडीने चालू करावे अशी मागणी अध्यक्ष न्यू महाराष्ट्र पॅथर सेना (महाराष्ट्र राज्य) रा. दौंड जयदीप बगाडे यांनी मुख्याधिकारी साहेब दौंड नगरपरिषद दौंड यांना विनंतीपूर्वक केलेली आहे.दि.२३.०१.२०२४ गुरुवार रोजी जयदीप बगाडे यांनी हे निवेदन दिलेले आहे. दौंड नगर परिषदेमार्फत आरक्षण क्र.३९ स.न. २१८ व २१९ ( सि.स.न. २६६४ व २६३५ ) या जागेवर बौद्ध विहार बांधण्यासाठी मे. नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी यांना वर्क ऑडर जा. क्र.७३३/२० दि.११.०३.२०२० रोजी झाली असून मे.नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीने पाच वर्षांमध्ये फक्त पिलिन्य लेवलचे काम करून पाच वर्षापासून आहे. त्या स्थितीमध्ये काम बंद अवस्थेमध्ये आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून काम करावे. आहे त्या रेटमध्ये कारण निमा पेक्षा जास्त ठेकेदार यांना बिल काढून देखील पाच वर्षापासून काम बंद आहे. हा संवेदनशील विषय असून दौंड शहरांमध्ये सर्वात जास्त बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे. जर हे काम असेच रेंगाळत राहिले तर बौद्ध समाजामधून उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. काम थांबले गेल्यास दौंड नगरपरिषद व महाराष्ट्र प्रशासन जबाबदार असेल. शासनाने दिलेल्या नियमापेक्षा ठेकेदार मे.नोबल कन्स्ट्रक्शन कंपनी यांना मोजमाप पुस्तकीचे नियम धाब्यावर बसवून बिल काढले आहे. या ठेकेदारावर कायदेशीररित्या कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. जाणून-बुजून नवबौद्ध समाजाचे मंदिर उभारण्यास दौंड नगरपरिषद व महाराष्ट्र प्रशासन अडथळा निर्माण करत आहे . याची दखल घेऊन तातडीने बौद्ध विहाराचे काम चालू करावे अन्यथा तीव्र स्वरूपात न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहे असा इशारा बगाडे यांनी दिलेला आहे. या निवेदनामध्ये अध्यक्ष जयदीप बगाडे, संजय कांबळे ,राजू गायकवाड, फिरोज तांबोळी, जाकीर सय्यद ,भारत सरोदे, दीपक लांडगे, आकाश पाडळे यांनी सह्या केलेले आहेत.