संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — प्रहार संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी रामेश्वर मंत्री यांची निवड करण्यात आली.
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव पदी दौंड तालुक्यातील प्रहार संघटनेचे सुरुवातीपासून एकनिष्ठ असलेले रामेश्वर मंत्री यांची निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांनी केली.
रामेश्वर मंत्री हे प्रहार दिव्यांग संघटनेच्या स्थापनेपासून कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. यापूर्वी त्यांनी दौंड शहर अध्यक्ष, दौंड तालुका अध्यक्ष, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषविले आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यात प्रहार संघटना वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान आहे. दौंड तालुक्यातील दिव्यांगांना शासकीय योजनेची लाभ मिळवून देण्यासाठी तसेच दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी प्रशासकीय कार्यालयासमोर यशस्वीपणे आंदोलने केलेली आहेत.
प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या उपस्थित शेतकऱ्यांसाठी काढलेली आसूड यात्रा भव्य स्वागत समारंभ शेतकरी मेळावा याचे आयोजन केलेले होते. बच्चु कडू यांच्या उपस्थितीत दौंड शहरात दोनदा भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन रामेश्वर मंत्री यांनी केलेले होते. त्यांनी आजपर्यंत केलेल्या शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष या पदावरील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांनी त्यांची प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.