संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड येथील सद्भावना रिक्षा संघटना दौंड शहर व तालुका यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. यानिमित्त दौंड शहरातून भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या संख्येने रिक्षाचालक मालक सहभागी झाले होते. रविवार (दि.२६) प्रजासत्ताक दिनानिमित्त दौंड रेल्वे स्टेशन येथील सद्भावना रिक्षा स्टॅण्डच्या परिसरात पताका व सजावट केली होती. स्पीकरच्या माध्यमातून देशभक्ती गीत लावण्यात आले होते. गोलराऊड ते अण्णाभाऊ साठे उद्यान दरम्यान रिक्षा रॅली काढण्यात आली होती. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौक, संत गाडगेमहाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक, संत मदर तेरेसा चौक, मौलाना अबुल कलाम आझाद चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान याठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दौंड रेल्वे स्टेशनचे प्रबंधक ए के सिंग आणि जे एन त्रिपाटी यांनी रिक्षा रॅलीला झेंडा दाखविला. तसेच अल्पपोहराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सांगता सभेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जाॅन फिलीप यांनी रिक्षाचलकांना मार्गदर्शन केले. यावेळी दौंड शहरध्यक्ष चंद्रशेखर कलपनूर, उपाध्यक्ष सतिश गाडीलकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेल्वे स्टेशन रिक्षा स्टॅण्डचे अध्यक्ष फ्रान्सीस डॅनियल कार्यध्यक्ष जेरी जोसेफ, डेव्हीड श्रीसुंदर, रायन डायस, गणेश सोनावणे, सुहास तांबे, सतिश तांबे यासह येथील सर्व रिक्षाचलकांनी परिश्रम घेतले.