दौंड | आत्ताच दिवाळीचा सण संपला लोकांनी गोड-धोड खाऊन फराळ करून आनंदाने दिवाळीचे फटाके वाजवले, आत्ता फटाकेबाजी नंतर दौंड तालुक्यात अठरा नोव्हेंबरपर्यंत राजकीय फटकेबाजी बघायला मिळणार आहे.
आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. दौंड विधानसभा निवडणुकीतून २० पैकी ६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.यामध्ये १) वीरधवल कृष्णराव जगदाळे, २) बादशाह आदम शेख, ३) सुमन राजेंद्र म्हस्के, ४) संदिप विक्रम आढाव, ५) वसंतराव विनायक साळुंखे, ६) राजाराम मारुती तांबे.एकुण २० उमेदवारांपैकी ६ जणांनी माघार घेतली, त्यामुळे आत्ता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहे.
आत्ता निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे.निवडणुकीच्या आखाड्यात एकुणच १४ पैलवान उरले आहे. यामध्ये १) राहुल सुभाष कुल (भाजपा), २) रमेश किसनराव थोरात (एनसीपी श प गट),३) रमेश थोरात (राष्ट्रीय मराठा पार्टी), ४) अविनाश अरविंद मोहिते (संभाजी बिग्रेड पार्टी),५) योगेश दत्तात्रय कांबळे (बहुजन समाज पार्टी), ६) राजेंद्र निवृत्ती मस्के(अपक्ष),७) जितेंद्र कोंडिराम पितळे (अपक्ष), ८) बिरुदेव सुखदेव पापरे (अपक्ष),९) जाधव सुरेश बीकु (अपक्ष),१०) संजय अंबादास कांबळे(अपक्ष),११) उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष), १२) शुभांगी नवनाथ धायगुडे (अपक्ष),१३) रवींद्र कुशाबा जाधव (अपक्ष),१४) सागर मारुती मासुडगे (अपक्ष). मुख्य लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच निवडणूक रंगणार आहे.त्यामुळे दिवाळीच्या फटाकेबाजी नंतर आत्ता तालुक्यात पाहायला मिळणार राजकीय फटकेबाजी..