संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड : शहरात नायलॉन मांजामुळे नागरिक पक्षी जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने माजांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
दौंड शहरामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर दौंड पोलिसांनी १४ जानेवारी रोजी धाड टाकून या प्रकरणी दोघांवर कडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
राज्य सरकारने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार नायलॉन मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्यांवर दौंड पोलिसांची करडी नजर होती. त्यानुसार, कुणीही नायलॉन मांजाची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिला होता. असे असतानाही दौंड शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्रीचा प्रकार सुरूच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने शहरातील दोन दुकानांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
या दरम्यान प्रज्वल राम बनसोडे जगदाळे वस्ती (वय २१) याच्या ताब्यातून १० नायलॉन मांजा रील (किंमत ५०००हजार), मनोज सुभाष नय्यर शालिमार चौक (वय ४३) याच्याकडून ६ नायलॉन मांजा रील (किंमत ३ हजार ) रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. त्या दोघांवर १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार २२३,२९२,२९३ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
दौंड मध्ये अवैध मांजाची विक्री जोरदार सुरू असून त्या विरोधात दौंड पोलीसांनी कंबर कसली आहे.