वृत्तवेध न्यूज नेटवर्क
चाकण – शहरालगत असणाऱ्या पोदार प्रेप चाकण रोहकल स्कुल मध्ये ‘दिवाळी मेला – उत्सव प्रकाशाचा ,’ हा सोहळा मंगलमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम सदर सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले पोदार इंटरनॅशनल स्कुल चे प्राचार्य विशाल जाधव तसेच पोदार प्रेप प्री स्कुल च्या हेड मिस्ट्रेस वरिष्ट पुबिंदर कौर यांच्या शुभहस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.
सदर दिवाळी मेला हा. आनंदाचा प्रकाश पसरवू घराघरात ही संकल्पना समोर ठेऊन ,साजरा करण्यात आले. सदर दिवाळी मेला मध्ये, मुलांना दिवाळी सण हा का साजरा केला जातो त्याचे महत्व, तसेच हा सण आपण कुटुंबियांसोबत साजरा करावा याचे धडे ही यावेळी मुलांना देण्यात आले. यावेळी मुलांना निरनिराळ्या मनोरंजनात्मक ऍक्टिव्हिटी ही घेण्यात आल्या. यावेळी पालक व विध्यार्थी यांनी, निरनिराळे आकाशकंदील व पर्यावरण पूरक आकाशकंदील बनवले. दिवाळी सणात घराची स्वच्छता कशी करावी, हे निरनिराळ्या चित्रसंदेशातून दाखवण्यात आले.
तसेच पेपर माध्यमातून रांगोळी कशी साकारावी याचे ही प्रशिक्षण सदर दिवाळी मेला मध्ये विद्यार्थी व पालक यांना देण्यात आले.
सदर दिवाळी मेला कार्यक्रमाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांमध्ये एकत्वाची भावना, बुद्धी कौशल्ये, सुप्त कलागुण यांची वाढ होऊन, आपल्या भारतीय सन उत्सव व परंपरा यांची बिजे रोवली गेली.व समाजिक व सांस्कृतिक वारशाची ची जपणूक ही करण्यात आली..
पोदार प्रेप च्या फाउंडर डायरेक्टर डॉ.स्वाती पोपट वट्स यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी बोलताना, प्राचार्य विशाल जाधव यांनी. मुलांना भारतीय परंपरा ,उत्सव यांचे महत्व, व ते साजरे करण्यामागचा उद्देश्य याचे अवलोकन केले व,पालकांनी,ही मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून, प्रत्येक सण हा मुलांसोबत साजरा करावा असे प्रतिपादन केले.व उपस्थित सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे आयोजन, पोदार इंटरनॅशनल स्कुल चे प्राचार्य विशाल जाधव व प्रेप प्री स्कुल च्या हेड मिस्ट्रेस पुबिंदर कौर यांनी केले. यावेळी विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.