Homeशिक्षण-प्रशिक्षणपोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल मध्ये बालदिन उत्साहात साजरा

पोदार इंटरनॅशनल स्कुल रोहकल मध्ये बालदिन उत्साहात साजरा

 

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

चाकण – शहरालगत असणाऱ्या रोहकलं येथील पोदार इंटरनॅशनल स्कुल प्रशालेमध्ये, बालदिन उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बालदिन व गुरु नानक यांच्या जयंती चे अवचित्य पाहता, गुरु नानक व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन व बालदिनाचा कार्यक्रम करण्यात आला.प्रथम कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी, प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव,उपप्राचार्या शीतल जयस्वारा ऍडमिन ऑफिसर संतोष मोरे या मान्यवरांच्या शुभहस्ते, दीप प्रज्वलंन करण्यात आले व पंडित नेहरू व गुरु नानक यांना अभिवादन करण्यात आले. सदर बालदिन व गुरु नानक यांच्या जयंतीचे अवचित्य पाहता, प्रशालेतील शिक्षक बांधव यांनी पंडित नेहरू व गुरु नानक या थोर व्यक्तिमत्वांवार प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली.

तसेच, गिते, बालगीते , कविता यांचे सामूहिक गायन, तसेच नृत्य ही सादर करण्यात आले.

तसेच आजची पिढी ही सोशल मिडीयाच्या खूप आहारी गेलेली आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचि जबाबदारी, अभ्यासाची , वाचनाची आवड निर्माण व्हावी, सोशल मीडियाचा वापर मर्यादितच करावा हे व्यक्त करणारी प्रशालेतील महिला शिक्षिका यांनी सकारलेली नाटिका तसेच विद्यार्थ्यांनी नेहरू व नानक यांच्या सकारलेल्या भूमिका कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना चित्रकला, नृत्य, जनरल गायन, इत्यादि कलात्मक स्पर्धांचे चे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना, प्रशालेचे प्राचार्य विशाल जाधव यांनी, प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले बालपण व बालपणातील गंमती यांची अनुभूती घ्यावी व विद्यार्थी दशेत असतानाच आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करावी तसेच, थोर महापुरुषांचा आदर्श सतत आपल्या मनामध्ये बाळगावा असे प्रतिपादन केले व उपस्थित सर्वांना बालदिन व गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाने केले, सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका पूर्णिमा तिवारी,व आभारप्रदर्शन शिक्षिका उपासना आंधळे यांनी केले.यावेळी, विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...

ला लीगा: रिअल माद्रिदने ज्युड बेलिंगहॅमसह ओसासुनाने आयोजित केले

ला लीगाचे नेते रियल माद्रिदने शनिवारी ओसासुना येथे 1-1 च्या बरोबरीत दोन गुण सोडले ज्यामध्ये ज्युड ज्युड बेलिंगहॅम सिंट ऑफ झाला. स्पॅनिश चॅम्पियन्सने पहिल्या...

सर्व गोष्टी चीज आवडतात? ही झटपट मिरची चीज डोसा आपला नवीन आवडता असेल

चीजमध्ये काही चव अधिक चांगली बनवण्याची शक्ती आहे, बॉलिवूड नाही का? हे एक सँडविच, बर्गर, पिझ्झा किंवा कदाचित कढीपत्ता आहे, हे त्वरित त्यास आणखी...

ला लीगा: रिअल माद्रिदने ज्युड बेलिंगहॅमसह ओसासुनाने आयोजित केले

ला लीगाचे नेते रियल माद्रिदने शनिवारी ओसासुना येथे 1-1 च्या बरोबरीत दोन गुण सोडले ज्यामध्ये ज्युड ज्युड बेलिंगहॅम सिंट ऑफ झाला. स्पॅनिश चॅम्पियन्सने पहिल्या...
error: Content is protected !!