संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड : महाराष्ट्रात क्रीडा संस्कृतीचे जतन व प्रचार प्रसाराची जोपासना करण्यासाठी व राज्यात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने क्रीडा धोरण जाहीर केले आहे. यामध्ये जिल्हास्तरावर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता दि. ०९ जानेवारी २०२५ ते दि.११ जानेवारी २०२५ या कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे बारामती या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये दौंड नगर परिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय भाग घेतला होता. सदर नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय दौंड नगरपरिषदेचा पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धामध्ये उत्तम सहभाग नोंदवून विजय कावळे, प्रशासक तथा मुख्याधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली ६ पदके मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली. फॅशन शो, बुद्धिबळ, कॅरम, गायन स्पर्धेत दौंड संघाचा इतर सर्व संघावर विजय मिळवत प्रथम विजेता होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे.
वैयक्तिक स्पर्धेत – बुद्धिबळ स्पर्धेत मनाली जामदार प्रथम क्रमांक, फॅशन शो स्पर्धेत प्रथम क्रमांक, स्लो डान्स स्पर्धेत स्नेहा खुडे द्वितीय क्रमांक, कॅरम स्पर्धेत तंजूम बागवान प्रथम क्रमांक, गायन स्पर्धेत विठ्ठल सोनवणे प्रथम क्रमांक, टेबल टेनिस स्पर्धेत विशाल मुळे द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
सदर स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा सह आयुक्त व्यंकटेश दुर्वास, नगरपरिषद प्रशासन शाखा पुणे विभाग उपायुक्त दत्तात्रय लांघी, सर्व मुख्याधिकारी, स्पर्धेत भाग घेतलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
” दौंड नगरपरिषदेस प्राप्त झालेले बक्षिस, बक्षीस वितरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.”