पाटस प्रतिनिधी /योगेश राऊत
- पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ जुन २०१६ पासुन प्रत्येक महिन्यांच्या २० तारखेस मोफत मोतीबिंदु निदान शिबीर नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटस व के.के.आय इन्स्टिटय़ूट साधुवासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाते.दिनांक २० ऑक्टोबर रविवार रोजी मोफत मोतीबिंदु निदान शिबीरात एकुण ६२रूग्णांची तपासणी करून ३२ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. २ रूग्ण हॉस्पिटलला रेफर करण्यात आले. दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २१ रूग्ण शस्त्रक्रियेसाठी बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें येथे पाठविण्यात आले.तसेंच १२ रूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.आजतागायत ऑक्टोबर २०२४ अखेर ७८७७ रूग्णांची तपासणी करून ५२३६ रुग्णांवर उत्तम प्रकारे .मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तसेंच २६४७ रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.अंधत्वाकडुुन द्रुष्टीकडे मोतीबिंदु मुक्त अभियान हा प्रकल्प राबविण्याचा संंघटनेच्या माध्यमातून मानस आहे.मोफत मोतिबिंदु निदान शिबीरात श्री.पाटील साहेब,श्री.गाढवे साहेब बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणें यांचे सहकार्य लाभले. यावेळी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ पाटसचे संस्थापक अध्यक्ष नेत्रमित्र डाॅ.पांडुरंग श्रीपतराव लाड. हे उपस्थित होते.