पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माजी आमदार रमेश थोरात गटाच्या छाया चंद्रकांत भागवत यांची निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतचे उपसरपंच पद हे रिक्त असल्याने या पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच तृप्ती भंडलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी छाया भागवत व राजेंद्र शिंदे या दोन सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात एकूण १७ सदस्यांनी मतदान केले. छाया भागवत यांना ९ तर राजेंद्र शिंदे यांना ८ मते मिळाली. भागवत यांना एक मत जास्त मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सयाजी क्षिरसागर यांनी त्यांचा विजय घोषित केला. सध्या आमदार राहुल कुल गटाकडे ग्रामपंचायतची सत्ता आहे. कुल गटाचा सरपंच आहे. मात्र उपसरपंच निवडणूकीत कुल गटाची दोन मते फुटल्याने थोरात गटाच्या भागवत उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
पाटस प्रतिनिधी / योगेश राऊत