संदिप बारटक्के | वृत्तवेध न्यूज
दौड : पोलिसांना नागरिकांशी थेट संवाद साधता यावा तसेच दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारींचा वेळीच निपटारा व्हावा यासाठी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी १८ तक्रारदार व गैरअर्जदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले.
याप्रसंगी दौंड पोलिसांनी आवाहन केले आहे की, आता दर शनिवारी दौंड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते ५ वाजेदरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी तक्रारदार व गैरअर्जदार यांनी दौंड पोलीस स्टेशनमध्ये दर शनिवारी हजर राहावे.
आज पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या उपस्थितीत तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे़. तक्रार निवारण दिवस कार्यक्रमात पोलीस अधिकारी, नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत. तक्रार निवारण दिनी तक्रार दाखल करण्यासह दाखल तक्रारींच्या कार्यवाहीची माहिती वरिष्ठांकरवी तक्रारदारास दिली जाणार आहे. समोर आलेल्या अधिकाधिक तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न यादरम्यान केला जाणार आहे.
याचा सकारत्मक फायदा होण्याची शक्यता दौंड पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.