संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
नागपूर येथे जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलनला सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश्व संमेलनाच्या लोगो अनावर प्रसंगी दिले.
संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेल नागपूर येथे जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्या संमेलनाचे लोगोचे अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले महा सम्मेलनाला सर्वतोपरी सहकार्य करेन. पंढरपुर येथील नियोजित श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकाबाबत लेखी निवेदन देण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र देऊन लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
यावेळी मा. भास्कर टोंपे, मा.संजयजी नेवासकार , ईश्वरज़ी धीरड़े, मा.अनंत जांगजोड़,श्री महेश मांढरे,श्री. सुनिल पोरे,डॉ.अज़यजी फुटाणे, राजुभाऊ किटे,प्रमोदजी कोरमकर,सुधर्मा खोडे,सुनिल जावरकार,दिपक नानोटकर, विलास धिरडे,किटेभाऊ चिमूर,प्रविणजी शिंत्रे,राजेशजी गंधे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती संतोष मुळे यांनी दिली