संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड – योगासने म्हणजे केवळ आसनं किंवा शारीरिक कसरत नाही तर तो आहे तन मन आत्मा अन् बुद्धी यांची सांगड जी जीवनात शांती आणि उत्तम स्वास्थ्य घेऊन येते.
दरवर्षी २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. दौंड शहरामध्ये जागतिक योग दिनानिमित्त साधकांनी योगाचे धडे घेतले, शहरात योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
दौंड शहरामध्ये पतंजली योग समितीच्या साधकांनी सकाळी सहा वाजता योग साधना केली.
पतंजली योग समितीचे प्रभारी राजू गजधाने यांनी ध्यान प्राणायाम आणि विविध प्रकारचे योगाचे आसणे शिकवले.
यावेळी वैभव टाटीया,भवर दुमावत, वैभव कांबळे, अशोक गायकवाड, बाळासाहेब साळुंके, प्रताप भोसले, शेखर गोलांडे, सिध्दार्थ वाघमारे उपस्थित होते.
पतंजली योग समितीचे दौंड तालुका प्रभारी राजू गजधाने गेली दोन तप (२२ वर्ष) योगाचे साधकांना धडे देत आहे.