संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — दौंड शहरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त पतंजली स्वाभिमान योग समितीच्या वतीने योग साधकांना योगाचे धडे राजेंद्र ओझा यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दौंड शहरामध्ये निरोगी जीवनाची गुरुकिल्ली योग आणि योगासन याची जनजागृतीसाठी पतंजली स्वाभिमान योग समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पतंजली स्वाभिमान योग समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीचा मुख्य उद्देश योग आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आहे. यावेळी नागरिकांना योगाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न मोटारसायकल रॅलीद्वारे करण्यात आला.
योग शिक्षक राजेंद्र ओझा गेली कित्येक वर्षे सकाळी ६ वाजता रेल्वे स्टेशन जवळील गणेश हॉल मैदानावर साधकांना योगाचे धडे देऊन योग साधना योग सेवा करत आहेत.
दौंडकरांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित योगासने व प्राणायाम करावे असे आवाहन राजेंद्र ओझा यांनी केले आहे.