संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड– लिंगाळी येथील दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन दोन मजली बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शक करताना म्हणाले की, शहरात दौंडचे पुढारी लक्ष घालत नसल्याने दौंड शहराचा विकास होत नाही, दौंडच्या विकासासाठी शहरातील कार्यकर्ते का लक्ष घालत नाही, तुम्हाला राजकारण करायचे ना ? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी दौंड शहरातील रिक्षाचालक,सामाजिक कार्यकर्ते जावेद अब्दुल सत्तार सय्यद यांनी ‘दौंड शहर दत्तक’ घ्या, म्हणून अजित दादांना पत्र दिले यावेळी अजित पवार यांनी मी जर दौंड च्या विकासासाठी लक्ष घातलं तर मी शहरातील अतिक्रमण काढणार, मी लक्ष घातलं तर मी रस्ते रुंद करणार, मी लक्ष घातलं तर ज्या गरीब लोकांना घरं नसतील तर त्यांना EWS मधुन घर मंजुर करणार. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे यांनी सात एकर जागा शाळेसाठी दिली आहे यामध्ये सीबीएससी स्कूल आणणार आहे.असे अजित पवार यावेळी म्हणाले.
१९९० च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार विजयी झाले होते,यांना सर्वात जास्त मताधिक्य दौंड तालुक्याने दिले होते. लोकसभेच्या माध्यमातून गेल्या चार दशकापासून ज्या घराण्याकडे तालुक्याचे पालकत्व आहे अशांकडेच दौंड दत्तक घ्या म्हणून आग्रह करणे म्हणजे.?
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिंगबर दुर्गाडे, माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे, उपाध्यक्ष अलका काटे आदी उपस्थित होते.