संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर राजू मुरलीधर मेरगळ यांची चेअरमन पदी तर व्हा.चेअरमनपदी महेश शामराव नांदखिले यांची निवड करण्यात आली आहे.
या संस्थेवर दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांचे वर्चस्व आहे. माजी चेअरमन वैशाली जगदाळे व व्हा चेअरमन अलका काटे यांनी राजीनामा दिल्यानंतर या निवडी करण्यात आल्या आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टि.एस.राजभोज व संस्थेचे सचिव रामचंद्र जगदाळे यांनी कामकाज पाहिले.
नुकतीच संस्थेने दौंड शहरालगत स्वमालकीची ११ गुंठे जागा घेऊन त्यावर सुसज्ज अशी बहुउद्देशीय इमारत उभी केली आहे. त्यामध्ये व्यापारी गाळे, ऑफिस ई गोष्टींचा समावेश आहे. निवडीनंतर माजी नगराध्यक्ष व संस्थेचे जेष्ठ संचालक इंद्रजित जगदाळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला .
संस्थेचे एकुण ११८५ सभासद आहेत. १ कोटी ३६ लाख भागभांडवल असणाऱ्या या संस्थेने ९ कोटी ८४ लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे.मागील वर्षी संस्थेला ७ लाख रुपयांचा नफा झालेला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, माजी संचालक शंकरराव गावडे संचालक बाळासाहेब लोंढे, जालिंदर जगदाळे, सुहास जगदाळे, रावा पडळकर,धोंडीबा मेरगळ, संजय आढाव, नवनाथ गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य संजीव गावडे, गंगाराम मेरगळ, संभाजी काटे आदी मान्यवर उपस्थित होते.