दौंड | विधानसभा निवडणूकीचा तालुक्यात हळूहळू धुराळा उडायला सुरुवात झाली.१९९ दाैंड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत दिनांक ३०/१०/२०२४ रोजी वैधरित्या नामनिर्देिष्ट उमेदवारांची यादी नमुना ४ नियम ८ नुसार तयार करण्यात आली.
दाैंड विधानसभा निवडणुकीत, मतदारसंघांत एकूण २० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यामध्ये विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार ॲड.राहुल कुल, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार माजी आमदार रमेश थाेरात, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे दाैंडचे माजी आमदार उषादेवी जगदाळे व बाळासाहेब जगदाळे यांचे पु़त्र व माजी जिल्हा परिषद सदस्य व पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,दाैंड शुगरचे जेष्ठ संचालक विरधवल जगदाळे पाटील, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार याेगेश कांबळे, संभाजी ब्रिगेड पार्टीचे अरविंद माेहिते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, राष्ट्रीय मराठा पार्टीचे रमेश जयसिंग थाेरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए )चे संदिप आढाव असे एकूण आठ तर अपक्ष १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. एकूण २० उमेदवार आपले भवितव्य आजमावण्यासाठी निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. दिेनांक ४ नोव्हेंबर राेजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. ४ नाेव्हेंबरला दाैंड तालुक्यात विधानसभेसाठी नेमके किती उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असतील ते चित्र स्पष्ट हाेईल.मात्र वरील सर्व उमेदवारांनी माेठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन करुन व सभा घेऊन वातावरण चांगलेच तापवले आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच खरी तुल्यबळ लढत होणार असली तरी १२ अपक्षांच्या निर्णायक निर्णयाकडे व मराठा समाजाचे मार्गदर्शक मनाेज जरांगे पाटील यांच्या भुमिकेकडे दाैंड तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.मात्र या निवडणूकीत मतदार काेणाची साथ साेडणार व काेणाला साथ देणार अशी चर्चा दाैंड च्या कानाकाेप-यात चालू आहे.
दाैंड तालुका प्रतिनिधी / सुभाष कदम