संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — दौंड शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीची झीज होत होती.
मूर्तीची ही झीज रोखण्यासाठी आणि दोन्ही पुरातन मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी १६ डिसेंबर २०२४ रोजी वज्रलेप प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
वज्रलेप ची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने बुधवार (ता.१२) रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत विधीवत मूर्तीची पुनःप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला.
वज्रलेपन नैसर्गिक पद्धतीने करण्यात आले यामध्ये कोणतेही केमिकलयुक्त रंग वापरले नाही. दौंड नगरीचे पाटील वीरधवल जगदाळे व त्यांच्या पत्नी डॉ संगीता जगदाळे, इंद्रजीत जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व धार्मिक विधी, होम-हवन करण्यात आले. तसेच यावेळी श्री व सौ वीरधवल जगदाळे पाटील, इंद्रजीत जगदाळे पाटील यांच्या हस्ते देवावर तेज अर्पण विधी पार पडला.पौरहित्य निखिल गुरव यांनी केले. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले.
वज्रलेपा नंतर काळभैरवनाथांचे तेज झळाळले. देवाच्या वज्रलेपाचा संपूर्ण खर्च सुमतीलाल कटारिया यांनी केला आहे.