दौंड : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दौंड शहरातील दत्तपीठ मंदिरात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेते यांचा दत्तपीठ मंदिराकडून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी ‘भारुड’ जागर संस्कृतीचा या लोककलेतून समाज प्रबोधन केले.शाम वाघमारे यांनी पिंगळा आणि नृत्य सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी गिरीम ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता किसन मदने यांचा सत्कार करण्यात आला.तसेच दत्तप्रभूंची आरती सौ मंगल विनय लोटके व सुनिता संदिप कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी लोकमतचे पत्रकार मनोहर बोडके म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांना जनमानसात खूप मोलाचे स्थान आहे.वृत्तपत्र विक्रेते ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ते नित्य आपले काम करत असतात.अन्नदानाची पंगत मंगला ताकवले, साधना देशपांडे,सुनंदा ठाणगे, उज्वला जोशी, जयश्री पवार, यांच्या वतीने देण्यात आली.दौंड मधील दत्तपीठ मंदिरात रंगला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जागर आदिशक्तीचा, ‘महाभोंडल्याची’ महिला भगिनींना पडली भुरळ.आरती लेले यांनी महाभोंडला सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना साने यांनी केले. यावेळी दत्तपीठ मंदिराचे प्रमुख विश्वस्त बुवा सावंत,ऍड.विलास बर्वे, सचिन साने, कुंडलिक चुंबळकर निलेश सावंत, पिंटू हजारे,एकनाथ कोरडे,सोनू सावंत, रतन बोधे, राहुल हजारे उपस्थित होते.