दौंड | दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील मैत्रेयी शितोळे एअर इंडिया मध्ये पायलट आहे.तिरुचिरापल्ली येथील विमानतळावरून शारजासाठी१४० प्रवासी घेऊन विमान निघाले होते. विमानाने ३६ हजार फुटांवर उड्डाण घेतले होते. यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला.हि बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवासी घाबरले.दरम्यान,विमानातील मुख्य पायलट व को पायलट मैत्रेयी शितोळे यांनी अत्यंत शिताफीने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.विमान सुखरूप लँडिंग झाल्यावर विमानातील प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.या घटनेनंतर दौंड तालुक्यातील लेकीचं भारतासह जगात कौतुक होऊ लागले.दौंड शहरातील दत्तपीठ मंदिराकडून यावेळी धाडसी कन्या मैत्रेयी शितोळे हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच श्री गजानन जेष्ठ नागरिक संघाकडून सन्मान करण्यात आला.यावेळी दत्तपीठ मंदिराचे प्रमुख विश्वस्त बुवा सावंत, नंदू पवार,विलास बर्वे, निलेश सावंत,अशोक गायकवाड,श्री पंडित,अर्चना साने, शशिकला सावंत,अलांकृता सावंत, ऋतुजा सावंत, सतीश थोरात, राजू बारवकर हनुमान लांडगे, श्याम वाघमारे, दीक्षित देशपांडे, उबाळे सर, पाठक उपस्थित होते.