दौंड तालुका ग्रामीण प्रतिनिधी /सुरेश बागल
दौंड — स्व. सुभाष अण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांच्या शाळेत सोमवार (दि.६) रोजी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मतिमंद व अपंग मुलांना समोसा ,जिलेबी व फरसाण वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार राजेंद्र सोनवलकर, लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे, पत्रकार जयदीप बगाडे, दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कदम, शहराध्यक्ष विजय जाधव ,कार्याध्यक्ष सदाशिव रणदिवे, सचिव सुरेश बागल, दौंड तालुका साप्ताहिक अग्निसंकेत वृत्तपत्राचे संपादक हरिभाऊ क्षीरसागर, दौंड परिवर्तन साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक रमेश चावरिया, लिंगाळी माजी ग्रा. सदस्य सदाभाऊ पासलकर, ज्येष्ठ नागरिक दिलीप पासलकर उपस्थित होते.
विकलांग व मतिमंद मुलांना खाऊ वाटप केल्यामुळे शाळेतील शिक्षक आणि मुलांकडून सर्व पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.
हा कार्यक्रम चांगला आणि कौतुकास्पद झाला . आणि यशस्वी करण्यासाठी भारतीय पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर आणि दौंड तालुका सचिव सुरेश बागल यांनी प्रयत्न केले त्याबद्दल दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम यांनी आभार मानले. पत्रकार हे दिवस रात्र सामाजिक कामासाठी धडपडत असतात सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे लिंगाळीचे सरपंच सुनील जगदाळे म्हणाले. शाळेतील मुलांना खाऊ वाटप केल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता.
मुलांना खाऊ वाटप झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांनी दौंड तालुका भारतीय पत्रकार संघाचे व उपस्थित सर्व पत्रकारांचे व मान्यवरांचे स्वागत करून मनापासून आभार मानले.
शिक्षक दिगंबर पवार, गणेश हाके निरमल्ला हिप्परगी, विक्रम शेलार, वैभव शेलार, संजय बनसोडे, विकास जाधव, मोनिका गायकवाड सह आदी कर्मचारी उपस्थित होते.