Homeराजकीयदोन वस्तादाचे कसलेले पैलवान एकत्र; तालुक्याच्या राजकारणात रंगत.

दोन वस्तादाचे कसलेले पैलवान एकत्र; तालुक्याच्या राजकारणात रंगत.

 

वृत्तवेध न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राच्या राजकारणावर व प्रशासनावर प्रचंड प्रभाव असणारे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्रातील दोन नेते सर्वांना सर्वश्रुत आहेत. दोघांची दूरदृष्टी विचारांची प्रगल्भता तसेच आपल्या कामांवर प्रचंड निष्ठा असणारे ‘वस्ताद’ आपल्या कामाने चर्चित असतात.

या दोन वस्तादाचे कसलेले पैलवान पहिल्यांदाच विधानसभेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

स्वच्छ व चारित्र्यसंपन्न नेतृत्व म्हणून जगदाळे पाटील यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे पाटील असतील तसेच माँसाहेब उषादेवी जगदाळे पाटील असतील आणि आता तालुक्याच्या राजकारणात स्वतंत्र असे ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणून बाबा जगदाळे यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.एक जिल्हा परिषद सदस्य कशा प्रकारे गाव पातळीवर काम करू शकतात याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बाबा जगदाळे होय. छोट्या-मोठ्या वस्ती असो गाव असो तेथील रस्ते पाणी आरोग्य व ते गाव वस्ती सुंदर कशी होईल याचा सातत्याने पाठपुरावा करणारे एक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांच्या या नेतृत्वामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांनी दौंड शुगर सारख्या अत्याधुनिक कारखान्याची धुरा त्यांच्याकडे सोपवली. गेल्या दीड दशकापासून समर्थपणे बाबा ती धुरा सांभाळत आहेत शेतकऱ्यांची जीवन वाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या या कारखान्याची प्रगती दिवसेंदिवस प्रगतीपथावरच आहे. नेहमीच हार्ड वर्क न करता स्मार्ट वर्क करून सुद्धा आपण कामाचा ठसा उमटू शकतो हे बाबांच्या कामातून दिसून येते प्रत्येक गावामध्ये युवकांसाठी व्यायाम शाळा असो मंदिरासमोर सामाजिक सभामंडप तसेच समाजमंदिर असो छोट्या-मोठ्या वस्तीपर्यंत रस्ते असो किंवा गावातील छोट्या मोठ्या वस्तीपर्यंत विद्युत लाईट पुरवठा असो या सर्व छोट्या-मोठ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन बाबांनी गावाचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न केला आहे. शहराचे ‘पाटील’ म्हणून नेहमीच सर्व धर्माला समानतेची वागणूक देणारे व सर्व समाजाला सामावून घेणारे खऱ्या अर्थाने पाटीलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे ‘बाबा’ जगदाळे होय.२५ वर्ष एकमेकांच्या राजकीय विरोधात असणारे कुल व जगदाळे कुटुंब एकत्र आले आहेत. विधानसभेच्या प्रचारात मोठ्या मनाने बाबा जगदाळे मोठ्या भावाची भूमिका पार पाडत आहेत.

तसेच विधीतज्ञ,अभ्यासू आमदार असणारे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल कुल होय. प्रत्येक समस्याच्या मुळापर्यंत जाऊन सखोल अभ्यास करून विषय तडीस नेण्यास आमदाराचा हातखंड आहे. ते पाणी आरोग्य व प्रशासन सर्व विषयावर परिपूर्ण नियोजन करत शहराचा व तालुक्याचा कायापालट करत आहे.दौंड तालुक्याचा विकास करताना आपली स्वतःची एक छाप निर्माण करत आहे.वैद्यकीय क्षेत्रात आरोग्यदुत समजले जाणारे राहुल कुल आहेत.मागील पाच वर्षात आमदार म्हणून काम करत असताना काम करण्याचा अनुभव पाठीशी धरून त्यांनी या पंचवार्षिक निवडणुकीत विजय होऊन सुरुवात केली पण राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे त्यांनी मागील वेळच्या कार्यास गती देण्यास कमी पडले मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे पाहिजे तसा वेगाने दादांना विकास करता आला नाही पण या अडीच वर्षांमध्ये महायुतीच्या काळात दादांनी बरीच कामं मार्गी लावली चेहरा नसलेल्या दौंड शहराला एक चेहरा देण्याचा प्रयत्न केला भविष्यात स्मार्ट सिटी प्रमाणे नियोजन करण्याचा एक आराखडा तयार केला. दौंडचं रेल्वे स्टेशन असो प्रांत कार्यालय असो सरकारी दवाखाना असो दौंड पोलीस स्टेशनची नव्याने होणारी इमारत असो अशा सर्व शासकीय इमारती त्यांनी स्वतः लक्ष घालून तयार करताना नियोजनबद्ध केले आहेत शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न नेहमी सातत्याने दादांना भेडसावत असे खडकवासल्यापासून सर्वसामान्य शेतापर्यंत येईपर्यंत पाण्याचा निचरा होत असे कितीतरी हजारो कोटीचा प्रकल्प त्यांनी हाती घेऊन खडकवासला ते यवत पर्यंत किंवा बोगदा मार्गे पाणी आणून वायपट जाणारे पाणी त्यांनी थांबवले आहे हा महत्त्वपूर्ण साकारत असताना त्यांनी फार अभ्यासपूर्वक ही योजना राबवली आहे भविष्यात पण शैक्षणिक अनुशेष भरुन करताना कटिबद्ध असतील सातत्याने नागरिकांची प्रश्न सोडवणे करता दादा नेहमीच अग्रेसर असतात कुठल्याही प्रकारचं काम असो वेळेचे भान न ठेवता दादा सदैव तत्पर असतात असे कार्य करणाऱ्याला पुन्हा एकदा दौंडकर संधी देणार का..

कुल आणि जगदाळे एकत्र राहिल्यास दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास तसेच नियोजनबद्ध शहर व गावचा विकास होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

Apple पलची एलिगंट एआय फ्रेमवर्क नॉन-ह्युमोइड रोबोट्स चळवळीद्वारे हेतू व्यक्त करण्यास मदत करू शकते

Apple पलच्या संशोधकांनी एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) फ्रेमवर्क विकसित केला आहे जो मानव नसलेल्या रोबोट्सना त्यांचे हेतू व्यक्त करण्यास आणि मानवांशी व्यस्त राहू...

अगं शिजू शकणारे लोक: दिलजित डोसांझ व्हॅलेंटाईन आठवड्यात त्याच्या स्वयंपाकाची कौशल्ये दर्शविते

दिलजित डोसांझ हा एक खरा करमणूक करणारा आहे, त्याने त्याच्या आश्चर्यकारक स्क्रीनची उपस्थिती आणि चैतन्यशील गाण्यांनी आनंदित केले. ऑफ-स्क्रीन, त्याचे मूर्खपणाचे व्यक्तिमत्व आणि विनोदी...

टीम इंडियाने लोकांना ‘दान देणगी, सेव्ह लाइव्ह्स’ मोहिमेमध्ये सामील होण्यास उद्युक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यापूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेड्सडेला, माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारतीय संघाच्या खेळाडूंनी लोकांना 'एन आणि अवयवदानासाठी प्रतिज्ञा' मध्ये...

Apple पलची एलिगंट एआय फ्रेमवर्क नॉन-ह्युमोइड रोबोट्स चळवळीद्वारे हेतू व्यक्त करण्यास मदत करू शकते

Apple पलच्या संशोधकांनी एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) फ्रेमवर्क विकसित केला आहे जो मानव नसलेल्या रोबोट्सना त्यांचे हेतू व्यक्त करण्यास आणि मानवांशी व्यस्त राहू...
error: Content is protected !!