संदिप बारटक्के, वृत्तवेध न्यूज
दौंड — मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल च्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेत दिव्यांगाच्या व्यथा अजित दादा समोर मांडल्या तसेच विविध मागण्यांचे निवेदन दिले.
दिव्यांग बांधव अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त असतात. ते अधिक कष्टाची कामे करू शकत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. शासनाकडून दरमहा दिड हजार मिळणारी पेन्शन मध्ये वाढ करुन ती पाच हजार करावी. राज्य शासनाने दिव्यांग बांधवांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी दोनशे स्क्वे.फुट ची जागा देण्याची योजना सुरु केली, राज्यातील किती दिव्यांग बांधवांना जागा मिळून त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु होऊन पुनर्वसन केले यांचा शासनाने ऑडिट करावा. दिव्यांग बांधवांना नगरपालिकेत राजकीय आरक्षण देऊन विनाअट नगरसेवक पद देऊन सन्मान करावा. लोकसभेत तथा विधानसभेत पाच टक्के राजकीय आरक्षण देऊन दिव्यांगाना स्वीकृत सदस्य घेण्याचा कायदा पास करावा,असे दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी अपंग सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद साळवे, पुष्पा गोसावी, गणेश शेंडगे,कैलास शिंदे, विजय थोरात, प्रथमेश बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.