दौंड | दरोडा, घरफोडी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार मिथुन प्रकाश राठोड (रा. राघोबानगर ,गिरीम) मागील १ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दौंड पोलीस गुन्हे शोध पथकाने आरोपीला गजाआड केले आहे.
दिनांक. ६/१/२०२४ रोजी फिर्यादी आशिष रमेश प्रजापती (रा. कुरकुंभ ) याच्या राहत्या घरामध्ये पाच अनोळखी व्यक्तींनी प्रवेश करून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी देवुन जबरी चोरी करून फिर्यादीचा मोबाईल व रोख रक्कम ४६,०००/- असा मुद्देमाल चोरी केला होता. सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी मिथुन प्रकाश राठोड (रा. राघोबानगर, गिरीम) हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. तसेच इतर २ घरफोडी मध्येही तो गुन्हा घडल्यापासुन फरार होता. सदरचा आरोपी हा काल दिनांक २९/१०/२०२४ रोजी मौजे गिरीम, राघोबानगर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यास दौड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने त्यास अटक केली. सदर आरोपी विरूध्द भिवंडी पोलीस स्टेशन हद्दीत एकुण १२ गुन्हे दाखल असुन दौंड पोलीस स्टेशन हद्दीत एकुण ५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. उगले, पो. हवा. सुभाष राउत, पो. हवा नितीन बोराडे, पो. हवा. विठ्ठल गायकवाड, पो. हवा. अमिर शेख, पो. हवा. निखील जाधव, पो. कॉ. नितीन दोडमिसे, पो. कॉ. पवन माने, पो.कॉ. जागताप यांनी केली.